ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

MSRTC News: महिलांसाठी गुडन्यूज! आजपासून बस प्रवासात 50 टक्के सवलत; शासनाकडून आदेश जारी

Mahila Sanman Yojana: महिला सन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ST Travel Discount For Womans: राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला होता. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता. या बद्दलची एक महत्वाची बातमी आता समोर येत असून अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला आहे. शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येईल. तसेच या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT