MAHARASHTRA ST BUS FARE HIKE: TRANSPORT MINISTER HINTS AT TICKET RATE INCREASE saam tv
महाराष्ट्र

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

Maharashtra ST bus fare hike latest update: डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळावर सुमारे १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे तिकीट दर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.

Bharat Jadhav

  • इंधन खर्च वाढल्याने एसटी महामंडळाच्या आर्थिक ताण वाढणार

  • एसटी तिकीट दर वाढण्याची शक्यता व्यक्त.

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीचे संकेत दिले.

पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात महागाईचा भडका उडाला आहे. आधी दूध, मग सीएनजी आणि आता पेट्रोल-डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. त्यात आता महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसचा प्रवास सुद्धा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे १२५ कोटींचा अतिरिक्त भार एसटी महामंडळावर येणार आहे. त्यामुळे आता एसटी बस तिकीट दरातही वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

त्याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिलेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठका घेतली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी तिकीट दर वाढीचे संकेत दिलेत. त्याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिलेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना तिकीट दरवाढीचे संकेत दिलेत.

शासनाकडून एसटीला किती पैसे मिळतात?

एसटी बस प्रवासात महिलांना जी सूट दिलेली आहे, त्याचे पैसे राज्य शासनाकडून आम्हाला मिळतात. दिव्यांग किंवा समाजातील काही घटकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. ते पैसेही राज्य शासन आम्हाला देत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे, ते पैसे शासन देते. असे असले तरी शेवटी एसटी महामंडळाला सक्षमतेकडे वाटचाल करावी लागणार आहे.

ज्या ज्या वेळेस गरज पडते, तेव्हा आम्ही शासनाकडे पैसे मागतो. नवीन बस घ्यायच्या असतील, तर शासनाकडे पैसे मागतो. प्रत्येक गोष्टीसाठी शासन पैसे देते. एसटी स्टँड बांधणे, दुरुस्ती/सुधारणा करणे यासाठी पैसे आम्ही शासनाकडून घेतो, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

ज्या काही गोष्टी अपरिहार्य आहेत, त्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतील. २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सगळ्या बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आता आम्ही ८ हजार बस डिझेल घेतलेल्या आहेत. परंतु भविष्यात इलेक्ट्रिक बस विकत घेण्यावरच भर राहील. सगळ्या इलेक्ट्रिक बस घेतल्या तरी त्याला चार्जिंग स्टेशन लागतील. राज्यात एसटी महामंडळाच्या २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया केली जात आहे, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

SCROLL FOR NEXT