uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election 2022: उद्धव ठाकरे गटाचा भाजपला पहिला धक्का; साेलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता

चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिले खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.

राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेना आता पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतली आहे. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. सोलापुरात सुभाष देशमुख यांचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांचा हा पराभव मोठा धक्का देणारा आहे.

आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष होतं. अन् अश्यात सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

राज्याच्या आज 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकलाकाकडे सर्वाचं लक्ष लागलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील 36, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6,अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, धुळे 41, जळगाव 20, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT