MAHARASHTRA CROSSES 1.5 CRORE SMART METER INSTALLATIONS, ACHIEVES NEARLY 50% TARGET Saam tv
महाराष्ट्र

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Maharashtra Smart Meter Project News : महाराष्ट्रात स्मार्ट मीटर प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून राज्यभरात 1.50 कोटींहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना वीज वापरात पारदर्शकता निर्माण होणार आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात 1.50 कोटींहून अधिक स्मार्ट वीज मीटर

  • स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग आणि रिअल-टाइम वीज वापराची माहिती मिळणार

  • वीज चोरी, तांत्रिक बिघाड कमी करणे यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त

महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून गुरुवारपर्यंत राज्यभरात १.५० कोटींहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे प्रमाण राज्यात बदलल्या जाणाऱ्या एकूण वीज मीटरपैकी जवळपास ५० टक्के असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक आधुनिक करण्याच्या हेतूने हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरु करण्यात येत आहे.

महावितरण (MSEDCL) तसेच मुंबईतील बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांच्या प्रयत्नांतून हा प्रोजेक्ट राबवला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्याने बसवण्यात आलेल्या अनेक स्मार्ट मीटरांनी जुन्या उपकरणांची जागा घेतली आहे. यामध्ये वापराची कोणतीही नोंद न करणाऱ्या सुमारे १००० ‘झिरो मीटर’चाही समावेश होता.

स्मार्ट मीटरमुळे आपण नेमकी किती वीज वापरतो याची अचूक नोंद होण्यास मदत होत असून ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरानुसारच बिल आकारले जात आहे. त्यामुळे चुकीची किंवा अंदाजे बिले येण्याच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत काही ग्राहकांमध्ये असलेल्या शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि वीज कंपन्यांनी जनजागृती मोहिमा अधिक वेगाने सुरू केल्या आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची जवळपास रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते.

वापरकर्ते तासामागे, दररोज आणि महिन्याला किती वीज वापरली याचा आढावा घेऊ शकतात. तसेच मागील वर्षातील वापराशी तुलना, अंदाजित बिलांची माहिती आणि वापरामध्ये अचानक वाढ झाल्यास तत्काळ सूचना मिळू शकतात. वीज कंपन्यांसाठीही ही प्रणाली फायदेशीर ठरत आहे. नेटवर्कचे रिअल-टाइम निरीक्षण, वीज चोरीचा शोध, वितरणातील नुकसान कमी करणे आणि तांत्रिक बिघाड त्वरित ओळखणे यामुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत आहे. याशिवाय ‘टाइम-ऑफ-डे’ दरप्रणालीमुळे कमी मागणीच्या वेळेत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बिलात बचत करण्याची संधी मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT