maharashtra rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वारा अन् गारांचा वर्षाव, बळीराजाचे नुकसान

Maharashtra Rain Update : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा दिलाय. राज्यातील विविध भागात वादळी वारा आणि गारांचा वर्षाव झाला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

Vishal Gangurde

राज्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं आहे. ऐन उन्हाळ्यात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील सोलापूर, सातारा, वाशिम, कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मात्र, राज्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पंढरपूरला पावसाने झोडपले

पंढरपुरात आज अवकाळी पावसाच्या धारा कोसळल्या. शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र आज सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या अवकाळी पावसाने काही प्रमाणात काढणीस आलेल्या पिकांना फटका बसलाय. शिवाय बेदाणावर अवकाळी पावसाचा परिणाम झालाय.

साताराच्या कराडमध्ये गारांचा खच

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये अनेक ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळत आहे. कराडला अवकाळी पावसासह गारांनी झोडपले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अवकाळीने शेतीला फटका

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात अवकाळी पाऊस बरसला. त्यानंतर आज पुन्हा वाशिम शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा बीज,हळद पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी

राजापुरात दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने आधीच अवकाळीचा अंदाज वर्तवला होता. राजापूर तालुक्यात तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडलाय. पावसामुळे आंबा व्यापारी चिंतेत पडलाय. आधीच उत्पादन कमी आणि त्यात आता अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT