सांगली महापालिका निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का
मिरजमधील राष्ट्रवादी (अजित गट) उमेदवार आजम काझी हद्दपार
एकूण आठ जणांवर हद्दपारीची कारवाई
विजय पाटील, साम प्रतिनिधी
सांगली महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत आणि उद्या मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग सहामधील उमेदवार आजम काझी यांच्यासह आठ जणांच्यावर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे मिरजेत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजपकडून राजकीय सुडबुद्धीतून एक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आजम काझी यांनी केला आहे.प्रभाग सहामधील अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यातून आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या सभेतून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी ग्रह मंत्रालय आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता त्यानुसार त्याचा उपयोग माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप देखील आजम काजींकडून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभागातील उमेदवार म्हणून मैनुदिन बागवान यांच्या अर्जावर देखील भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता,आता आपल्यावरही आज कारवाई केल्याचा भाजपाने केल्याचा आहे.दरम्यान आजम काजींवर झालेल्या हद्दपारच्या कारवाईने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं डोकंवर काढल्यानं पोलिसांचे टेन्शन वाढलंय. त्याच गु्न्हेगारांना उमेदवारी देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत पुण्यात अजित पवार गटानं गु्न्हेगारी जगताशी संबंधितांना उमेदवारी दिलीय. बंडू आंदेकर याच्या पत्नी आणि सून ज्या खंडणीप्रकरणी संध्या तुरुंगात आहेत त्यांना राष्ट्रवादीनं भवानीपेठमधून अधिकृत उमेदवारी दिली आहे. गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीनं निवडणुकीचा एबी फॉर्म दिलाय. तर वनराज आंदेकरच्या हत्येचा आरोप असलेला गुंड गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर नानापेठमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.