महाराष्ट्र

caste certificate : जात प्रमाणपत्र मिळत नाही, लातूरमध्ये तरूणाने उचलले टोकाचे पाऊल, शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप

Latur suicide case linked to Mahadev Koli caste certificate delay : लातूरमध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली आहे. महादेव कोळी समाजातील शिवाजी मेळळे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र न मिळाल्याने जीवन संपवलं. चार दिवसात लातूरमध्ये दोन जणांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचललं आहे.

Namdeo Kumbhar

  • लातूरमध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्याने ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.

  • शिवाजी मेळळे या तरुणाने विजेचा करंट घेऊन जीवन संपवलं.

  • सुसाईड नोटमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र न मिळाल्याचं कारण दिलं.

  • चार दिवसात लातूरमध्ये दोन जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

  • घटनेमुळे गावात व राज्यात शोक व संतापाचं वातावरण.

संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी

Why did the Latur youth commit suicide over caste certificate? आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. राज्यातील लोकही आक्रमक झालेत. गेल्या काही दिवसांत आरक्षण टिकाने अन् मिळावे, या मागणीसाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. शनिवारी धाराशिवमध्ये आरक्षणासाठी एका आयुष्य संपवल्याची घटना ताजी असतानाच आता लातूरमध्येही एका व्यक्तीने आरक्षणासाठी आयुष्य संपवले आहे. महादेव कोळी समाजाच्या तरूणाने निलंगा तालुक्यात आयुष्याचा शेवट केला. मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्रच मिळत नाही, अशी चिठ्ठी लिहून ३२ वर्षाच्या तरूणाने आय़ुष्य संपवले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी लातूरमध्ये एका व्यक्तीने ओबीसी आरक्षण राहिले नाही, असे म्हणत आयुष्याचा दोर कापला होता. चार दिवसात लातूरमध्ये दोन जणांनी आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलले आहे.

लातूरमधील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी मेळळे या ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज प्रलंबित होता, प्रमाणपत्र न मिळाल्याने शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मुलांना मिळत नव्हत्या. दरम्यान याच मानसिक तणावाखाली शिवाजी मेळळे यांनी विजेच्या करंटचा धक्का घेऊन, आत्महत्या केली आहे. शिवाजी मेळगे यांनी आयुष्य संपवण्याआधी आपल्या व्यथा पत्रात लिहिल्या आहेत. त्यांची सुसाईड नोट मिळाली आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय काय?

'माझी दोन लेकरं शिकायला आहेत.. मी मजुरी करून घर चालवत आहे. लेकराला महादेव कोळीचं प्रमाणपत्र मिळत नाही. हे सरकार प्रमाणपत्र देत नाही. म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय' अशी चिठ्ठी लिहीत ३२ वर्षाच्या शिवजी या तरुणाने आपलं जीवन संपवल आहे. दरम्यान या घटनेने दादगी गावात शोककळा पसरली आहे. लातूरमध्ये चाल दिवसात आरक्षणासाठी दोन जणांनी आयुष्य संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

SCROLL FOR NEXT