Maharashtra Rain Update: Heavy Unseasonal Rain Fall in Nagpur, Wardha, Buldhana, Gondia Region Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: ढग दाटले, भरदिवसा अंधार पडला अन् सरी बरसल्या... नागपूर, वर्ध्याला अवकाळीचा तडाका; शेतीमालाचे नुकसान

Wardha, Nagpur, Buldhana, Gondia Weather Update: आज नागपुरमध्ये काळे ढग दाटून आले अन् सकाळी सकाळी जोरदार पाऊस झाला. नागपुरसह वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, ता. ९ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे. राज्यभरात उन्हाच्या वाढत्या झळांनी नागरिक हैराण झालेत. अशातच आज नागपुरमध्ये काळे ढग दाटून आले अन् सकाळी सकाळी जोरदार पाऊस झाला. नागपुरसह वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

भरदिवसा अंधार अन् मुसळधार पाऊस...

नागपुर शहरात सकाळी सकाळीच काळोख दाटून आला अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाकडून आज पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या अंदाजानुसार सकाळ सकाळीच नागपुरकरांना पावसाने झोडपून काढले. भरदिवसा मोठ्या प्रमाणावर काळे ढग दाटून आले होते. त्यामुळे शहरात अंधार पसरला होता. यावेळी अंधारामुळे वाहनचालकांना दिवसा गाडीच्या लाईट्स लाऊन प्रवास करावा लागला.

वर्ध्यातही अवकाळीचा तडाका..

वर्धा जिल्ह्यामध्येही गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत होता. अशातच आज सकाळी अचानक वातावरणात बदल होत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी तीळ आपल्या शेतात कापणी करून ठेवला आहे तर काही पिके कापणे सुरु आहे.

गोंदियात बरसल्या सरी, शेतकऱ्यांचे नुकसान..

नागपुर वर्ध्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातही दमदार पावसाने हजरी लावली. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हगामातील धान बांधावर कापून ठेवल्याने शेतात सर्वत्र पाणी साचून आहे. त्यामुळे अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

बुलढाण्यात अवकाळी पावसाची हजेरी..

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर साखरखेर्डा परिसरात दमदार अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने मका, ज्वारी, उन्हाळी भुईमुंग व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच साखरखेर्डा परिसरातसुद्धा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला यामुळे पाणी पुरवठावर परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT