Rain Yellow Alert Saam TV
महाराष्ट्र

Rain Yellow Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Maharashtra Rain Update: आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Ruchika Jadhav

संजय महाजन, जळगाव

राज्यात एकिकडे उष्णतेची लाट पसरली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. कुठे वादळवारा तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मात्र चांगलाच चिंतेत आला आहे.

गेल्या २ आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सूरू झालंय. अद्यापही अवकाळी पाऊस थांबता थांबत नाहीये. जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसत आहे.

आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काही जिल्ह्यांत वादळ वाऱ्यासह तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

विदर्भात हवामान विभागकडून आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. सकाळपासून आभाळ असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ येथे गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तसेच चंद्रपूर गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशीम येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Rain Alert) हवामान विभागाने दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने विदर्भात अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने वातावरणात बदल पाहायला मिळाला होता.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेचा तडाखा कायम असला तरी ठाणे, मुंबई आणि पुण्यातही पाऊस येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. तसेच अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हाडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT