Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Rain News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात; पुण्यातही बरसल्या सरी, पुढील ३ ते ४ दिवस येलो अलर्ट

Monsoon In Solapur Pune Mumbai Kalyan: राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही

राज्यामध्ये यंदा मान्सूनची दणक्यात सुरूवात झाली आहे. विविध शहरांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. जागोजागी पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे. मुंबईचा पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.दहिसर पूर्वेकडील शिवाजीनगर आणि एस्स वी रोडवरील पेट्रोल पंपसमोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा याठिकाणी झाड पडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज पहाटे तासभर कल्याण डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली आहे. सुमारे तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. अधूनमधुन पावसाची जोरदार सर कोसळत (Maharashtra Rain Update) होती. पावसाला जोर नसला तरी रिमझिम पावासामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.

सोलापूर शहरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे (Monsoon) शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर सखल भागात पाणी शिरलं आहे.मृग नक्षत्राच्या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे चाळीशी पार जाणाऱ्या तापमाणात ही घट झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आजही जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याने व्यक्त अंदाज केला आहे.

पुढील तीन-चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. तर सरासरी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज (Maharashtra Weather) आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT