Rain update: राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा अंदाज Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : दिवाळीवर पावसाचे सावट! विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

weather forecast in marathi : आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात साजरी करावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Rain Update News in Marathi : आज वसूबारस, दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण जास्त राहणार नाही, पण रिमझिम का होईना पण राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम सुरु झालाय, शेतामध्ये पेरणीच्या कामाला वेग आलाय. त्यातच आता पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर, यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, पश्चिम मराहाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी येथे आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ तारखपासून पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ३० तारखेला हा पाऊस अहिल्यानगर, सातारा, सांगलीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिक आणि कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १ नोव्हेंबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.एकंदरीत यंदा दीपोत्सव पावसातच साजरा करावा लागू शकतो.

हवेची गुणवत्ता बिघडतेय -

मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदवली होती. पण शुक्रवारपासून हवेची गुणत्ता दर्जा मध्यम श्रेणीत येत आहे. ऐन दिवाळीत हवेची गुणवत्ता आणखी ढासळण्याची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे. थंड, ताप, सर्दी खोकला यासारखे आजारांचे प्रमाण वाढले आहे.

पावसाळ्यानंतर वाऱ्याची स्थिती बदलते, वेग मंदावतो, त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. त्यामुळे धूलिकण हवेतच तरंगतात. त्यामुळे आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shash Mahapurush Rajyog: दिवाळीत ३० वर्षांनी बनला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार

Maharashtra News Live Updates : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Sanjay Raut News : संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, म्हणाले आमच्याकडूनही तशी चूक होईल

Crime News : दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्यांनो सावधान, गर्दीत चोरटे करतायेत हात साफ; पाहा धक्कादायक CCTV व्हिडीओ

Umesh-Priya : लपवा-लपवीचे दिवस अन् पेपरात फोटो; उमेशने सांगितला रिलेशनशिपचा हटके किस्सा!

SCROLL FOR NEXT