Hingoli Rain
Hingoli Rain Saam Tv
महाराष्ट्र

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, अख्खं गाव पाण्याखाली, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. काल रात्री हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब झाले आहे. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला आहे. तसेच वसमत तालुक्यातील नदी काठच्या घरांची पडझड झाली आहे. तर शेतात पाणी साचले असून, गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maharashtra Rain Update)

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने या परिसराला पाण्याने वेढा दिला आहे. या पावसाचे पाणी कुरुंदा गावात अनेकांच्या घरात घुसले आहे. गावातील अनेकांचे संसार देखील पाण्यात बुडाले आहेत तर, या गावातील रस्ते देखील पाण्याच्या खाली गेले आहेत. कुरुंदा गावासोबत या परिसरातील इतर गावात देखील पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पथके नियुक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

'रात्री बारानंतर मोठा पाऊस झाला. आता शासनाच्या टीम मदत करत आहेत. सध्या पणी कमी होत आहे, गावातील उंच ठिकाणी नागरिकांनी हलवले आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, सुरक्षीतस्थळी रहावे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे, अशी माहिती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT