Maharashtra Rain Updates Maharashtra Rain Live News and Updates in Marathi (20 July)
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: अखेर वरुणराजा बरसला! नागपूरनंतर पुणे, नगर, बीडला पावसाने झोडपले; नागरिकांची तारांबळ

Maharashtra Weather Update: नागपूरप्रमाणेच राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळिराजाला दिलासा मिळाला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Rain Updates:

गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच राज्यात पावसानेही जोरदार एन्ट्री केली आहे. नागपूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती. नागपूरप्रमाणेच राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळिराजाला दिलासा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन केल्याने बळिराजाला दिलासा मिळाला आहे. शनिवार (२४, सप्टेंबर) बीड (Beed Rain Updates) जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी परिसरात तब्बल 4 तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला.

या मुसळधार पावसाने बावी - डोईठाण जवळील पूल वाहून गेल्याने 15 ते 20 गावांचा आष्टी शहराचा संपर्क तुटला आहे. तसेच पुराच्या पाण्यात बावी येथील शेतकऱ्याच्या 6 शेळ्या वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टी झाल्याने परिसरातील खरीप पिके देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बीडप्रमाणेच अहमदनगर (Ahmednagar Rain Update) शहरासह जिल्ह्यात काल दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. तर नगर शहरातील वार्ड नंबर 15 मधील अचानक वस्तीतील अनेक घरांमध्ये रात्री उशिरा पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तसेच घरात पाणी शिरल्याने संसाराउपोगी वस्तूंचे नुकसान झाले.

पुण्यातही पावसाची बॅटिंग...

पुण्यात (Pune Rain Updates) काल झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ झाली. शहरात कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, नगर रस्ता, वडगीव शेरी या परिसराला शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने झोडपले. या पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

कर्वेनगर (Karvenagar) येथील स्मशानभूमीत पाणी घुसले, तर डहाणूकर कॉलनी येथील पादचारी मार्गामध्ये पाणी शिरलाने भुयारी मार्ग बुडाला होता. तसेच डहाणूकर कॉलनी चौकातील भुयारी मार्गात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे संपूर्ण भुयारी मार्ग पाहण्याखाली गेला. पावसामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच गडबड उडाली. सोबतच महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुनाही समोर आला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT