Political News : माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम भाजपकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता; विश्वसनीय सूत्रांची माहिती

BJP News : अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde
Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shindeSaam Tv

Mumbai News :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीमध्ये सहभागी नव्हते. लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde
Maharashtra Politics: सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; शाह, शिंदे आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा; काय ठरली रणनीती?

मुंबईतील एका मतदारसंघातून माधुरी दीक्षीत, जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनिल देवधर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा झाली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Political News)

आमदार अपात्रतेची सुनावणी

बैठकीत आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यां तिघांमध्येच बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde
Pm Modi News: वाराणसीत PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घेतली उडी

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर हे ज्याप्रकारे आमदार अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळत अहेत, त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच याप्रकरणी कारवाई कुठपर्यंत पोहचली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता ही सुनावणी वेगाने केली जाऊ शकते. त्यामुळे यामध्ये येणार निर्णय आणि त्याचे पुढील राजकारणावर होणारे परिणाम याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com