Maharashtra Rain News Today: Heavy Rain in Raigad, Chhatrapati Sambhajinagar and Pune District Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Weather Today: राज्याला आजही अवकाळीचा तडाखा; वादळीवाऱ्याने रायगडला झोडपलं, पाहा Video

Heavy Rain in Maharashtra's Raigad, Badlapur, Chhatrapati Sambhaji Nagar: विजांचा कडकडाड, वादळी वाऱ्यासह आजही अवकाळी पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांनी झोडपून काढलं. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Sandeep Gawade

हवामान विभागाने १६ मे रोजी कोकण पश्चम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्याने रायगडमधील माणगावला झोडपल्याने मोठं नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झालं आहे. इमारतींवरील पत्र्याच्या छप्परांचं नुकसान झालं आहे. दरम्यान वादळीवाऱ्यामुळे कामानिमित्त घरा बाहेर जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. माणगावमध्ये झालेल्या वादळाचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. माणगाव रेल्वे स्टेशन नजीक मुंबई गोवा महामार्गावर मोठं झाडं पडलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. मदतकार्य यंत्रणा घटणास्थळी दाखल झाल झाल्या असून रस्त्यात पडलेलं झाड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह वादळीवाऱ्याच्या पावसाला सुरुवात झालीय. तालुक्यातील ममदापूर, जामगाव अगर कन्नड गाव या शिवारात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये उन्हाळी बाजरी आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र शेतातील उन्हाळी पिकासह जनावरांचा चारा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे.

बदलापुरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीही असाच अवकाळी पाऊस बदलापुरात पडला होता. तर कल्याण डोंबिवलीत ढगाळ वातावरण असून पंधरा ते वीस मिनिटांपासून सोसाट्याचा वारा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी डोंबिवलीत दाखल झाले आहेत, मात्र शिंदेंच्या प्रचार रॅलीवर पावसाचं सावट आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या डोंबिवलीत होणाऱ्या सभेवर देखील पावसाचं सावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT