MAHARASHTRA WEATHER UPDATE Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात धो-धो पाऊस! पुढचे ४ दिवस महत्वाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यासाठी पुढचे ४ दिवस महत्वाचे असणार आहेत. मुंबईसह कोकणात आज मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More
  • मुंबईसह संपूर्ण कोकणाला पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

  • राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचले

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढणार

  • हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या काही तासांत मुंबईच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप मुलुंड, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. इस्टर्न फ्रीवेवरील दृश्यांवरून पावसाचा जोर स्पष्ट होत आहे. यामुळे रस्ते वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला. दरम्यान मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. आजपासून ते ४ जुलैपर्यंत या भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून वीकेंडलाही अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं आणि गरज असल्यासच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पाऊस परतण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातल गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यात ६४ मिलिमीटर पाऊस पडला असून तीन वर्षातील हा सर्वात कमी पाऊस आहे. या वर्षीय जिल्ह्यात सरासरी पेक्षा ६१ टक्के पावसाची तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. राज्यात १ ते ३० जून दरम्यान सरासरी १३३ मिलिमीटर पाऊस पडतो. पण यावर्षी केवळ ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या एका बॅचवर बंदी

नेहमीच पोहे खाऊन कंटाळा आला? मग बनवा मुगाच्या डाळीपासून स्वादिष्ट डोसा

मुंबईत झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी

Wednesday Horoscope : वाद टाळा, ५ राशींच्या व्यक्तींना कामात यश मिळणार; वाचा आजचे राशीभविष्य

Investment Fraud: दुप्पट परताव्याचं आमिष भोवलं! 500 गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा, तिघांचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT