अकोला हादरलं! काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

Attack On Congress Corporator Husband : अकोल्यातील रामदास पेठ भागात झालेल्या एका भीषण हल्ल्यात काँग्रेसच्या एका नगरसेविकेचे पती गंभीर जखमी झालेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून, जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Attack On Congress Corporator Husban
Congress corporator husband attacked in Akolasaam tv
Published On
Summary
  • अकोल्यात काँग्रेस नगरसेविका साफिया बी यांच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाला.

  • जखमी याकूब खान पैलवान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

  • ही घटना रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोल्यात काँग्रेसचे नगरसेविकेच्या पतीवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला झालाय. अकोला महापालिकेच्या प्रभाग 17 च्या नगरसेविका 'साफिया बी' यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला झालाय. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. याकूब खान पैलवान असं जखमी झालेल्या नगरसेविका पतीचे नाव आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरसेवकाच्या पतीवर हल्ला झाल्यानेजिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलसमोर गर्दी केली आहे. हल्लाखोर पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान हा जीवघेणा हल्ला नेमकं कोणत्या कारणावरून झाला, याची माहिती अद्याप कळू शकली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com