Ahmednagar Beed Train Services Saam Tv
महाराष्ट्र

महत्वाची बातमी! अहिल्यानगर- बीड रेल्वेसेवा १९ मेपर्यंत बंद, नेमकं कारण काय?

Ahmednagar Beed Train Services: बीड- अहिल्यानगर रेल्वेसेवा पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. १९ मेपर्यंत या मार्गावर रेल्वेसेवा बंद राहणार आहे. दुहेरी मार्गाच्या कामामुळे ही रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

Priya More

Summary -

  • अहमदनगर–बीड रेल्वे सेवा १९ मेपर्यंत बंद

  • दुहेरी मार्गाच्या कामामुळे रेल्वेसेवा राहणार बंद

  • प्रवाशांना प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन

अहिल्यानगर- बीड रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर- बीड रेल्वेसेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुहेरी मार्गाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घेत आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोळनेर- अहिल्यानगर -निंबळक सेक्शनदरम्यान सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे ब्लॉक कालावधीत अहिल्यानगर स्टेशनवरील फक्त अप आणि डाउन मेन लाईन रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध राहील. गाडी क्रमांक ७१४४१ (अहिल्यानगर–बीड) आणि गाडी क्रमांक ७१४४२ (बीड–अहिल्यानगर) या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही ट्रेन १९ मेपर्यंत बंद रहाणार आहेत.

अहिल्यानगर- बीड रेल्वेमार्गावरील रेल्वेसेवा ४ मे २०२६ पासून ते १९ मे २०२६ पर्यंत लागू राहील. लाईनची क्षमता वाढवणे, परिचालन कार्यक्षमता सुधारणे आणि भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत करणे या उद्देशाने असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची सुरक्षित आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही रद्दबातल करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी उपरोक्त बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इंटर-लॉकिंगचे काम वेगाने सुरू आहे. हा काम पूर्ण झाल्यानंतर अहिल्यानगर ते बीड प्रवास सुसाट आणि कमी वेळाचा होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बेस रेल्वेद्वारे बीडवरून अहिल्यानगरला जाण्यासाठी फक्त २ तास ३० मिनिटं म्हणजे अडीच तासांत पोहचता येईल. आता या प्रवासासाठी ५ तासांचा कालावधी राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT