- मंगेश भांडेकर
आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीने (maharashtra pradesh congress committee) लाेणावळ्यात 17 आणि 18 फेब्रुवारीला चिंतन शिबीर (congress chintan shibhir in lonavala) आयाेजित करण्यात आले आहे. या शिबीरात सुमारे 300 प्रमुख नेते चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबीरात काॅंग्रेस नेते राहूल गांधी (congress leader rahul gandhi) ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला गडचिराेलीत दिली. (Maharashtra News)
काँग्रेस पक्षाची नागपूर विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक आज (शनिवार) गडचिरोलीत होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व अन्य दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे.
चेन्निथला म्हणाले काँग्रेस पक्षात एक व्यक्ती एक पद धोरण संघटनेच्या खालच्या स्तरावर लागू होण्यासाठी कालावधी लागणार असून भाजप मोठ्या संख्येत इतर पक्षांचे नेते आयात करत आहे कारण त्यांच्याकडे नेते नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी सोबतची जागा वाटप बोलणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार अंतिम करणार असल्याचेही चेन्निथला यांनी नमूद केले. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांच्या यात्रेत विघ्न आणणा-यांचा गडचिरोलीत काँग्रेस नेत्यांकडून निषेध करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.