maharashtra politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे - ठाकरे एकाच मंचावर येणार? काय आहे कारण?

Maharashtra Political News : आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत..मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला जाणार का? आणि शिंदे वरळीच्या मैदानात आदित्य ठाकरेंची कशी कोंडी करत आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

नारळी पौर्णिमेला कोळीवाड्यात झालेल्या राड्यानंतर आता पुन्हा एकदा 14 ऑगस्टला वरळीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने येणार आहेत... आणि त्यासाठीचं कारण आहे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्याचा कार्यक्रम... याच कार्यक्रमाची पत्रिका आता समोर आलीय..

ही कार्यक्रम पत्रिका नीट पाहा.. या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आदित्य ठाकरेंचंही नाव आहे.... मात्र आदित्य ठाकरेंना भाषणाची संधी देण्यात येणार नाही.. त्यामुळे वरळीत पुन्हा श्रेयवादाची लढाई रंगलीय...

  • मविआच्या काळात बीडीडी पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात

  • शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात उर्वरित काम

  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळात अंतिम टप्प्यातील काम पूर्ण

  • ठाकरेंनी कार्यक्रमाला दांडी मारल्यास भाजप-शिंदेसेना श्रेयवादात बाजी मारण्याची शक्यता

खरंतर शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमने-सामने आले नाहीत.. तर याआधी समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यातील टशन पहायला मिळालीय....

शिंदे-ठाकरे आमने-सामने

- 24 मार्च 2025

नगरविकास खात्यासंदर्भात मुंबईतील आमदारांच्या बैठकीत आमने-सामने

- 8 ऑगस्ट 2025

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी समोरासमोर

- 14 ऑगस्टचा वरळीतील बीडीडी चाळीतील लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमामुळे वरळीतील राजकारणाला नवी चावी मिळण्याची शक्यता आहे..त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत एकनाथ शिंदे आणि भाजप आदित्य ठाकरेंना धोबीपछाड देणार की ठाकरेंना डावलल्याने वरळीकर महापालिका निवडणुकीत महायुतीला इंगा दाखवणार? याचीच चर्चा रंगलीय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT