Congress leader Balasaheb Thorat About MVA SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाविकास आघाडी एकत्र लढणार? काँग्रेसची भूमिका स्पष्ट; आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

Balasaheb Thorat Latest News: अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Chandrakant Jagtap

Congress leader Balasaheb Thorat About MVA: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि पक्षातील बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन युती सरकारमध्ये सामिल झाले. राष्ट्रवादीतील या भूकंपामुळे राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की 'आम्ही (राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट) भाजपविरोधात एकत्र लढू. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राज्यातील जनता आमच्यासोबत आहे'.

विरोधी पक्षनेतेपदावर बोलताना थोरात म्हणाले की, "ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदार असतील, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असेल. आमच्याकडी आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा विरोधी पक्षनेता होईल". (Breaking News)

दरम्यान उद्धव ठाकरे देखील आज महाविकास आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पक्षाची भूमिका ठरवण्यात येणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील महाविकास आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी एकत्र राहील असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील पवारांशी चर्चा झाली असून, त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत मिळून पुन्हा सर्व उभा करू असा शब्द दिल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT