Loksabha Election 2024 : नितीश कुमार मोठा धक्का देण्याच्या तयारीत; नवा प्लान आला समोर, भाजप अलर्ट

Nitish Kumar In Loksabha Elections 2024 : पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहरा असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Nitish Kumar contest Lok Sabha Election Latest News In Marathi
Nitish Kumar contest Lok Sabha Election Latest News In MarathiSAAM TV
Published On

Nitish Kumar In Lok Sabha Elections 2024 : देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू असतानाच, पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहरा असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातील या चर्चेमुळे भाजप सतर्क झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐतिहासिक अशा फुलपूर लोकसभा मतदारसंघातून नितीश कुमार (Nitish Kumar) आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात तशी चाचपणी सुरू आहे. या सर्व्हेतून नेमकं काय समोर आलं आहे, याबाबत संयुक्त जनता दलाचे नेते, पदाधिकारी कमालीची गोपनियता बाळगून आहेत. मात्र, भाजप आधीच अलर्ट झाला आहे. (Politics News)

Nitish Kumar contest Lok Sabha Election Latest News In Marathi
Sharad Pawar | शरद पवारांनी केली वकिलांशी चर्चा, कायदेशीर लढाई लढणार पवार?

फुलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या भाजप खासदार केशरीदेवी पटेल करत आहेत. या मतदारसंघात जवळपास २० लाख मतदार आहेत. येथे पटेल समुदायाचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. हे मतदार ज्या उमेदवाराला पाठिंबा देतात, त्याचं पारडं जड मानलं जातं.

जवाहरलाल नेहरू यांनी केलंय या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व

दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाला ऐतिहासिक महत्व आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, नितीश कुमार या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Nitish Kumar contest Lok Sabha Election Latest News In Marathi
Ajit Pawar Statement: राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच; अजित पवारांचे ठाम मत

नितीश कुमार यांनी मे महिन्यात जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांना राष्ट्रीय सरचिटणीस केलं होतं. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढावी, अशी पक्षाची इच्छा आहे, असे ते म्हणाले होते.

...तर २० वर्षांनंतर लढवणार लोकसभा निवडणूक

नितीश कुमार यांनी २००४ मध्ये नालंदा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. नालंदातून ते विजयी झाले होते. मात्र, बाढ मतदारसंघातून ते पराभूत झाले होते. जर पुढील वर्षी फुलपूरमधील लढले तर तब्बल २० वर्षांनी ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील. असं झालं तर राज्याबाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com