Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री (Deputy CM) पदाची शपध घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.
अशामध्ये आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. तसंच, सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवारच (Sharad Pawar) राहणार आहेत.', असे स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'सुनिल तटकरे यांची आम्ही प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. विरोधी पक्ष नेता निवडण्याचे काम विधासभा अध्यक्षाचे असते. जो पक्ष सत्तेत नाही. विरोधी पक्षात आहे. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त संख्याबळ असते. त्याच्यातील एकाची विरोधीपक्ष नेते म्हणून निवड केली जाते हे सर्वांना माहिती आहे. आम्हीच राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख असल्यामुळे प्रांताध्यक्ष या नात्याने आम्ही सुनिल तटकरेंची नियुक्ती केली. आम्ही पक्षहिताचे काम करत आहोत.', असे देखील त्यांनी सांगितले.
'माझ्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था आणि भिती निर्माण केली जात आहे. यामध्ये काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीचे बहुसंख्या आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणाचे काम आम्ही एकत्र करणार आहोत. पुढे देखील आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहणार आहोत. देशपातळीवर नरेंद्र मोदीसाहेबांचे नेतृत्व आहे. त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत.', असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'त्यांनी ९ आमदारांविरोधात नोटीस काढली. पण त्यांना नोटीस काढण्याचा काहीच अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. आमच्याबरोबरच्या सर्व आमदारांचे भवितव्य व्यवस्थित कसे राहिल, त्यांना कुठल्या अडचणी येणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत.' तसंच, 'बंड केले की नाही हे कायदा ठरवेल. महायुतीचे सरकार राज्यात चांगल्या पद्धतीने काम करेल.', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.