Hardik Joshi-Akshaya Deodhar In Politics : राणादा - पाठक बाईंची नवी सुरूवात ; शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
Hardik Joshi-Akshaya Deodhar In Politics
Hardik Joshi-Akshaya Deodhar In PoliticsSaam TV
Published On

Marathi Celebrity In Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाला रामराम करत भाजपाशी हात मिळवणी केली आहे. तर काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. आता या पार्श्वभूमीवर अनेक एक महत्त्वाची बातमी आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आज माजी आमदार शिशिर शिंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे गटाचा राजीनामा त्यांनी राजीनामा दिला होता. सोबत ठाकरे गटाचे विलास पारकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Latest Entertainment News)

Hardik Joshi-Akshaya Deodhar In Politics
Recreation Of Amitabh Bachchan Song : आजी-आजोबांनी अमिताभ बच्चन - मौसमी चॅटर्जी'चं 'रिमझीम गिरा सावन' केलं रिक्रिएट ; आनंद महिंद्रानीही केलं कौतुक

तर या राजकीय नेत्यांसह मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके या कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे हे सर्वांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे. (Celebrity)

कलाकारांचा पक्षात पक्ष प्रवेश करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील अनेक कलाकारांनी विविध पक्षात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरे, गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

Hardik Joshi-Akshaya Deodhar In Politics
Prabhakar More: हास्यजत्रेतला 'कोकणचा पारसमणी' प्रभाकर मोरेची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षात केला प्रवेश

सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेते नेहमीच एकेमकांसाठी उभे असतात. राजकीय नेत्याच्या गल्लीला आपण कलाकार पहिले आहेत. तर कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राजकीय नेते देखील अनेकदा पुढे आले आहेत. अनेक कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. तसेच देशातील राजकारणात त्यांना महत्त्व देखील आहे. यात साऊथ जयललिता, जया बच्चन, हेमा मालिनी, उर्मिला मातोंडकर, गोविंदा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com