Maharashtra Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election: महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? महायुती चेहऱ्याविना लढणार?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यासाठी महायुतीने कंबर कसलीय. महायुतीकडून वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. त्यात महायुतीने नवा डाव आखलाय. काय आहे हा डाव हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख असलेला केक कापलाय. तर दुसरीकडे विधानसभेसाठी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? विधानसभेसाठी भाजपची रणनीती काय? यावर महायुतीत चर्चा सुरूच आहे.. मात्र याच प्रश्नाचं उत्तर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अधिवेशनात दिलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

विधानपरिषद निवडणूकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीने विधानसभा (Vidhan Sabha) निवडणूकांसाठी कंबर कसलीय. त्यातच भाजपने पुण्यात, शिंदे गटाने ठाण्यात तर अजित पवार गटाने वेगवेगळे मेळावे घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. मात्र पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेसाठी विशिष्ट चेहरा पुढे करणार नसल्याचे सांगत चेहऱ्याविनाच निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत.

विधानसभेसाठी महायुतीचा (Mahayuti) चेहरा कोण? याची सातत्याने चर्चा होत असते. त्यातच काही महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे हेच विधानसभेसाठी चेहरा असतील, असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेनंतर भाजपचे सूर हळुहळू बदलायला लागले आहेत. त्यातच विधानपरिषदेच्या विजयानंतर विधानसभा निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नाही तर मोदींच्या नेतृत्वात लढण्याचे संकेत भाजपने दिले होते.

लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्यानंतर पदरी पडलेल्या पराभवामुळे भाजप सावध झालाय. त्यातच आता भाजपने विधानसभेची रणनीती स्पष्ट केलीय. त्यामुळे भाजपची नवी रणनीती शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य होणार का? आणि भाजपची रणनीती यशस्वी ठरणार का? हे विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT