Sangamner Constituency  Saam Tv
महाराष्ट्र

Sangamner Constituency: संगमनेरकरांचा यंदा कौल कोणाला? थोरात आपला गड कायम राखणार की भाजप गुलाल उधळणार? घ्या जाणून

Sangamner Constituency Profile Congress vs BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील चुरस दिसत आहे. आता संगमनेर विधानसभा मतदारसंघात कोण विजय उधळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील सत्तासंर्घषाचं महत्वाचं केंद्र म्हणजे संगमनेर तालुका. संगमनेरमध्ये गेल्या सहा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसनेच विजयाची पताका फडकावलेली आहे. यंदा होणाऱ्या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात आहेत. मागील सहा निवडणुकांमध्ये थोरात यांनीच विजयाचा गुलाल उधळलेला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला होता. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील चुरस पाहायला (Maharashtra Politics) मिळणार, हे नक्की. संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्याची जादू अजून त्यांच्या विरोधकांना साधता आलेली नाहीये.

सध्या काय परिस्थिती ?

यंदा देखील संगमनेरमध्ये महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाचीच चर्चा (Vidhan Sabha Election) आहे. तालुक्यामधील जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका , ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थावर थोरात यांचंच वर्चस्व आहे. बाळासाहेब थोरात हे १९८२ पासून सलग सहावेळा निवडून आलेले आहेत. आजवर विरोधकांना त्यांच्या विरोधात एकजूट होता आलेलं नसल्याचं दिसतंय. संगमनेरमध्ये महायुती आता आपल्या कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुजय विखे यांनी देखील राहुरी किंवा संगमनेरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेले आहेत, परंतु त्यांनी अद्याप याबाबत काहीही अधिकृतपणे सांगितलेले नाही. त्यामुळे आता थोरात आपला गड कायम राखणार ( sangamner constituency profile) का, याकडे अख्या नगरकरांचं लक्ष लागलेलं आहे.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (Balasaheb Thorat) १,०३,५६४ मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेनेचे उमेदवार जनार्दन म्हातारबा आहेर यांचा ५८, ८०५ मतांनी पराभव झाला होता. यावेळी कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली होती. कॉंग्रेसने आपला बालेकिल्ला कायम ठेवत विजयाचा गुलाल उधळला होता.

२०१९ ची विधानसभा निवडणूक

संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि शिवसेनेत चुरशीची लढत झाली ( mva against mahavikas Aghadi) होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार ​​बाळासाहेब भाऊसाहेब थोरात १,२५,३८० मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार साहेबराव रामचंद्र नवले यांचा पराभव झाला होता. आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार का? याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT