NDA Party Member Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: छ. संभाजीनगरमध्ये महायुतीचं टेन्शन वाढणार, अजित पवारांच्या शिलेदाराने भाजपविरोधात केलं बंड!

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. अनेक बड्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पक्षांतराला सुरूवात झाली आहे. यंदा तरी निवडणुकीला तिकीट मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशामध्ये महायुतीमध्ये पहिली मोठी घडामोड घडली आहे. महायुतीमध्ये पहिलं बंड झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने भाजपच्या आमदाराविरोधात बंड थोपटले आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपचं टेन्शन वाढणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाणांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघामध्ये २००९ पासून भाजपचे प्रशांत बंब आमदार आहेत. सतीश चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रशांत बंब आणि महायुतीचे टेन्शन वाढले आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करतान यामागचे कारण देखील सांगितले आहे.

सतीश चव्हाण यांनी सांगितले की, ' मी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून गंगापूर मतदारसंघात काम करत आहे. मतदारसंघात मोठी अस्वस्थता आहे. गंगापूरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. गेल्या १५ वर्षांपासून कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. या मतदारसंघातील नागरिकांना आता बदल पाहिजे.' या मतदारसंघामध्ये भाजपने जर पुन्हा प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली तर प्रशांत बंब विरोधात सतीश चव्हाण यांच्यामध्ये सामना रंगेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

IPL 2025: राजस्थान रॉयल्स संघ या ४ खेळाडूंना करू शकतो रिटेन

SCROLL FOR NEXT