Jitendra Awhad On Sambhaji Raje : 'मेलो तरी संभाजी राजेंची माफी मागणार नाही'; हल्ल्यानंतरही जितेंद्र आव्हाडांची भूमिका

jitendra awhad car attack : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर आज ठाण्यात हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी हल्ल्यानंतरही संभाजी राजेंसंदर्भात केलेल्या विधानावर माफी मागण्यास नकार दिला आहे.
Jitendra Awhad On Sambhaji Raje
Jitendra Awhad On Sambhaji RajeSaam Digital
Published On

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर आज ठाण्यात हल्ला करण्यात आला आहे. संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी हल्ल्यानंतरही संभाजी राजेंसंदर्भात केलेल्या विधानावर माफी मागण्यास नकार दिला. जीव गेला तरी संभाजी राजेंची माफी मागणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

आशा भ्याड हल्ल्यामुळे माझ्या स्वभावात आणि धर्मनिरपेक्षतेत तसूभरही बदल होणार नाही. मी मुसलमानांसाठी लढत नसतो, सामाजिक विषायासाठी लढतो. गजापूरमध्ये तुम्ही जेव्हा मस्जीद तोडली, तेव्हा तिथे फक्त मुसलमान अथवा हिंदू राहत नव्हते. तिथे ८० टक्के हिंदू राहतात. ते ऐकोप्यानं राहतात, ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधील एका मस्जिदीच्या बाहेर दारावर गणपतीची मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली. ही सामाजिक एकता या घराण्याने जपायला पाहिजे होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारीक वारसदार -

गाडीवर दगड मारला म्हणून मी विरोधात बोलणार नाही, असे त्यांना वाटत असेल. पण मी आता अजून त्वेषाने आणि तिव्रतेने बोलणार आहे. आजपर्यंत मी आहो-जावो करत होतो. तुम्ही विचाराने चुकलात. तुम्ही शाहू महराजांचे विचार सोडलेत, आम्ही सोडले नाहीत . तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहे. स्वत:च्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकलं. वडिलांनी तुमचा निषेध केला, अशी परखड टीका जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली आहे.

Jitendra Awhad On Sambhaji Raje
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या जीपवर हल्ला; संभाजीराजे छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप, कुणी घेतली हल्ल्याची जबाबदारी? VIDEO

वडील खासदार झाल्यामुळे मनात राग -

तुमचे वडील खासदार झाले, त्याची आग तुमच्या मनात जळत आहे, हे त्यामागील खरे राजकारण आहे. तुम्हाला खासदार व्हायचं होतं, त्यासाठी तुम्ही प्रत्येक पक्षाकडे गेलात. तुम्हाला तिकिट दिलं नाही. त्यात वडील खासदार झाल्यामुळे मनात आग आहे. त्यामधून हे सर्व होत आहे. बेताल वक्तव्य करत आहात.

हा हल्ला आहे, तो माझ्यावरच आहे. मी बोललो होतो. त्यात पक्षाचा आणि याचा काही संबंध नाही. छत्रपती शिवाजीराजेंचे वारसदार, राजर्षी शाहू महाराज यांच्याशी गद्दारी संभाजी छत्रपती यांनी केली, हे मी आजही म्हणत आहे.आजपर्यंत माझ्या गाडीवर येण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं, पण आज झालं. चार ते पाच जण माझ्या गाडीच्या पाठलाग करत होते. दगडफेक झाली. काच फुटली, पुढे जाऊन गाडी थांबवली, पण तोपर्यंत ते पळून गेलो होतो.

पुण्यातील स्वराज्य पक्ष कार्यालयात पोलीस बंदोबस्त

जितेंद्र आव्हाड यांची जीप कार फोडल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर संचेती चौकातील स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Jitendra Awhad On Sambhaji Raje
Kalamnuri Assembly Constituency: कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय? महाविकास आघाडी की महायुती, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com