कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच वंचित आघाडीचे नेते उपस्थित नव्हते. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीने सवाल उपस्थित केला आहे.
देशात आणि महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि आरएसएसला (RSS) पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं ? असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २३ जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का? अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, या बैठकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सकाळी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता. राज्यातील वाढती गुन्हेगारी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच या सर्व मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीकडून कशाप्रकारे सरकारला घेरण्यात येईल, याची रणनितीही ठरवण्यात आल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.