Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला? ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार?

Thackeray Group MP: राजन साळवी यांनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची सेना खिळखिळी करण्यासाठी एक धक्का और दो चा नारा बुलंद केलाय.

Bharat Mohalkar

अडीच वर्षात दुसऱ्यांदा ठाकरेंची सेना फुटण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र ही चर्चा का सुरु झालीय? शिंदे गटाकडून ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आदित्य ठाकरेंनी दिल्लीत कशासाठी धाव घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची सेना खिळखिळी करण्यासाठी एक धक्का और दो चा नारा बुलंद केला जातोय. तर डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंतांनी चेंडू आता थेट ठाकरे खासदारांच्या कोर्टात ढकलाय. तर वेळीच सावध झालेल्या आदित्य ठाकरेंनी थेट दिल्लीत धाव घेतली आहे.

अडीच वर्षापुर्वी शिंदेंनी ठाकरेंना जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा ,सुरू असतानाच दिल्लीत पवारांनी शिंदेचा केलेला सत्कार ठाकरेंच्या जिव्हारी लागलाय.या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या एका खासदारानेही हजेरी लावली होती एवढंच नाही तर शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीलाही ठाकरेंचे खासदार उपस्थित राहिले होते.

ठाकरे सेना पुन्हा फुटणार?

पवारांच्या हस्ते झालेल्या शिंदेंच्या सत्काराला खासदार संजय दिना पाटील उपस्थित

मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी भाऊसाहेब वाक्-चौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव हे स्नेहभोजनाला उपस्थित

नागेश पाटील आष्टीकरांच्या घरी श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्के स्नेहभोजनाला हजर

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत मिळताच दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांनी निष्ठेची वज्रमुठ दाखवलीं होती. त्यावेळी संजय दिना पाटीलांनी दांडी मारली होती. तर ठाकरेंनीही सच्चा शिवसैनिक फुटणार नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी पाहता ठाकरेंचे खासदार शिवबंधन तोडून शिंदे गटात सहभागी होणार की आदित्य ठाकरेंच्या शिष्टाईला यश मिळून पक्ष निष्ठा जपणार? यावर ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT