Uddhav Thackeray suffers a political setback as Jalna’s Bhaskar Ambekar joins the Shinde-led Shiv Sena. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

Jalna Politics: भास्कर आंबेकर साडेतीन दशकांपासून उबाठा गटाशी एकनिष्ठ आहेत. पक्षात फूट पडल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय.

Bharat Jadhav

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह, पक्षाच्या नावाबाबत सुनावणी होणार आहे. दुसऱ्या बाजुला जालन्यात मोठी राजकीय घडामोड झालीय. सकाळी हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. जालना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना ठाकरे गटातून काढल्यानंतर शिंदेंनी लागलीच डाव टाकत भास्कर आंबेकर यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून स्थानिक राजकारण तापलंय. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवत आहे. त्याच्यासाठी युद्धपातळीवर इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात ओढून आणत आहेत. एकीकडे शिंदे गटाची ताकत संपलीय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते करत आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे गटात मोठी इनकमिंग होतेय.

ठाकरे गटातूनही अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षप्रवेशाचा हंगाम सुरू झालाय. अनेक नेत्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत. आज जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हजारो समर्थकासह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

जालन्यात ठाकरे गटाला खिंडार पडलंय. जालन्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला सोडचिट्टी देत आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील 39 वर्षापासून ठाकरेंच्या पाठीशी असणाऱ्या भास्कर आंबेकरांनी आज शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना आंबेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपल्याला डावललं जात होतं. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोक योग्य वागणूक देत नाहीत. जालना जिल्ह्यातील ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या शहरातून हाताळली जात असल्याचा आरोप आंबेकरांनी यावेळी केला.

दरम्यान भास्कर आंबेकर यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटानेही आपली प्रतिक्रिया दिलीय. भास्कर आंबेकर यांनी पक्षविरोधात कारवाया केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर भास्कर आंबेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय, अशी माहिती जालना ठाकरे सेनेनेकडून देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या मालाडमध्ये डबेवाल्याची सायकल चोरी

Jui Gadkari Village: अभिनेत्री जुई गडकरी मूळची कुठली? तिचं गाव कोणतं ? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं अनुदान का रखडलं? अदिती तटकरेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या...VIDEO

Peanut Thecha Recipe : चटपटीत शेंगदाण्याचा ठेचा, भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

SCROLL FOR NEXT