Maharashtra Politics 
महाराष्ट्र

MNS And Thackeray Group Alliance: महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार? महाराष्ट्रात नवी आघाडी होणार?

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा अधून मधून रंगत असतात.. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना दुजोरा दिलाय आदित्य ठाकरेंनी.आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? याबरोबरच कोणत्या अटींवर ठाकरे बंधू एकत्र येणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

गेल्या २ दशकांपासून दुरावलेले २ भाऊ एकत्र येऊ शकतात ही ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी जनाना हायसं वाटेल अशीच बातमी. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूमध्ये समझोता होऊ शकतो का याचं उत्तर थेट शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीच दिलय. मनसे कडून अधुनमधून प्रस्ताव येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

गेल्या काही वर्षात शिवसेना ठाकरे गटाचे युती, इंडीया आघाडी आणि मविआ असे प्रयोग करून झाले आहेत.मात्र ते फारसे फलदायी ठरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आता आपल्या भावाचा हात हातात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांना सामोरे गेले तर काय होऊ शकतं पाहूया.

महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार?

ठाकरे बंधू मराठी मनासाठी हळवा कोपरा

भाजपच्या हिंदुत्वाला ठाकरेंच्या हिंदुत्त्वाचा नवा पर्याय

विभागलेला मराठी माणूस एकत्र येणार

मुंबई-पुणे-नाशिक शहरातील मराठी मतं एकत्र येणार

दोन्ही पक्षांना बळकटी मिळण्याची शक्यता

कार्यकर्त्यांमध्येही उत्साह

विधानसभेच्या निकालानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर एका शब्दानंही टिका केलेली नाही. त्यानंतर खुद्द मनसेच्या प्रस्तावाची आदित्य ठाकरेंनी दिलेली थेट कबुली. त्यामुळे मराठीजनांच्या मनात इतक्या वर्षांपासून असलेली इच्छा ठाकरे बंधू पूर्ण करणार की मनसेचं इंजिन पुन्हा दुसऱ्याच स्टेशनवर जाणार हे बघणं औत्सुक्याचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT