Uday Samant, Uddhav Thackeray, Barsu Refinery Project Protest, Ratnagiri News saam tv
महाराष्ट्र

Uday Samant News: रस्त्यावर सभा घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Uday Samant On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या रस्त्यावरच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला गर्दी जास्त असते. पक्षप्रमुखापेक्षा जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहा पट गर्दी असते, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

Gangappa Pujari

अमोल कलये, रत्नागिरी|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Uday Samant News:

उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्योगममंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेला आता उदय सामंत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

"उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) रत्नागिरीतील सभा ही रस्त्यावरची सभा. ठाकरेंच्या रस्त्यावरच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला गर्दी जास्त असते. पक्षप्रमुखापेक्षा जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहा पट गर्दी असते. असे म्हणत अशा कितीही सभा झाल्या तरी आम्हाला फरत पडत नाही, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे लोक येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील," असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

रस्त्यावर सभा...

"पक्षप्रमुखांची शिवाजी पार्कला सभा होते ती सभा आता रस्त्यावर येऊन घ्यावी लागते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेला उत्तर देण्यापेक्षा जनता उत्तर देईल. स्वतःच्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी, हसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना हे करावंच लागतं. उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात कुठेही चौकशी लावावी, असे आव्हानही उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्मचिंतन करावं...

"मी बोलत नाही संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही असं समजू नये. शिवाजी पार्कला सभा घेणारे रस्त्यावर आले. रस्त्यावर, बोळामध्ये सभा घेणा-यांनी आत्मचिंतन करावं. मी लाचारपणे त्यांच्याकडे गेलेलो नाही मला अडीच वर्षांपूर्वी त्यांनी बोलावलं त्यांनी शपथ घेऊन सांगावं. उद्धव ठाकरे यांच्या स्क्रिप्ट लिहिलेला आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा," असा पलटवारही उदय सामंत यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT