Vijay Wadettiwar Slams On Mahayuti  
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: सरकारवर विरोधकांचा सर्वात मोठा आरोप; मंत्रालयात व्यापारी, बिल्डरांच्या चकरा, भ्रष्टाचार वाढलाय

Vijay Wadettiwar Slams On Mahayuti: सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून मते घेतली आहेत. बेईमान लोक खुर्चीवर बसलेत, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

Bharat Jadhav

मंत्रालयात व्यापारी,बिल्डर यांच्या चकरा वाढल्या आहेत. बिल्डर डेव्हलपर्ससाठी मंत्रालय झालंय. यंत्रणेवर कोणाचाही धाक राहिला नाहीये. भ्रष्टाचार वाढला असून कोणताही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर केलाय.

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून मते घेतली आहेत. बेईमान लोक खुर्चीवर बसलेत. सरकार शेतकरी, सामान्य माणूस यांचं काही देणंघेणं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी सरकारमधील नेत्यांमध्ये विसंगती निर्माण झाली होती. ते एकमेकांच्या फाईल अडवत होते. नेत्यांच्या विसंगतीमुळे विकासकामांवर परिणाम होणार होता. पण आता उशिरा का होईना, सरकारला शहाणपण सुचलंय.

सरकारमधील नेते ज्यांच्याकडे फाईल गेली की, ते त्यांच्या उशीखाली दाबून ठेवत. पण लोकांच्या बोंबाबोंब झाली, त्यानंतर आता फाईलचा प्रवास वाढलाय. पण त्यात पारदर्शकता दिसावी, अशी अपेक्षा करूया, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

शेतकरी घुमजाव करतील

सध्याचं सरकार झोपलेलं सरकार, सुस्त सरकार आहे. सरकार नवीन नवीन शोधत आहेय. राज्य सरकार वाईट आणि दयनीय परिस्थिती आहे. नवीन नवीन मुद्दे शोधत आहे, जेणेकरून यांच्याकडे लक्ष जाईल. सरकारजवळ पैसेच नाहीत. पैसे दिल्याचं दाखवलं. पण त्यांच्या बँक खात्यातून लगेच पैसे काढून घेतले. शेतकऱ्यांची फसवणूक करून या सरकारने मते घेतली. बेईमान लोक खुर्चीवर बसले आहेत.

सरकार शेतकरी,सामान्य माणूस यांचं काही देणंघेणं नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं महायुती सरकारने निवडणुकीच्यावेळी अश्वासन दिलं होतं. परंतु सरकारने आता त्यापासून त्यांनी घुमजाव केलं. आता शेतकरीही घुमजाव करतील असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी मारलाय. पण गेल्या काही दिवसात मंत्रालयात व्यापारी,बिल्डर यांच्या चकरा वाढल्या आहेत.

भ्रष्टाचार वाढलाय. कोणताही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीये. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करा, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT