Sharad Pawar And Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १० आमदार घरवापसी करणार?

Baramati Loksabha Election Result: बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार गटातील राज्यभरातील आमदारांनी शुभेच्छा दिल्या. अशामध्ये अजित पवार गटातील नाराज आमदार हे घरवापसी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

सुनिल काळे, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १० आमदार घरवापसी करण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटामध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार गटाच्या काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर अजित पवार गटातील राज्यभरातील काही आमदारांनी त्यांना मेसेज करून शुभेच्छा दिल्या. तर अजित पवार गटातील १० नाराज आमदार हे शरद पवार गटामध्ये परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार गटाचे १० आमदार नाराज असून ते घरवापसी करणार असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या आमदारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. सुप्रिया सुळे यांना अनेक आमदारांनी शुभेच्छांचे मेसेज पाठवले. त्याचसोबत १० आमदारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार गटातील काही नाराज आमदारांना त्यांचे भवितव्य अंधारात दिसत असल्यामुळे ते अशापद्धतीने पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. महाविकास आघाडीचे राज्यात ३० खासदार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्याकडे गेलेल्यांना या निवडणुकीत पिछाडी मिळाली आहे. अजित पवार गटाला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे हे आमदार घरवापसी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

Maharashtra Live News Update: स्नेहा झंडगे आत्महत्या प्रकरण; आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Solapur News: उसाचं बिल थकलं, युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, न्यायासाठी कुटुंबियांनी फोडला टाहो

भरत गोगावले यांचा पुन्हा पत्ता कट; १५ ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण|VIDEO

Election Commission: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; आणखी ४४६ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

SCROLL FOR NEXT