Supriya Sule  Saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule News: 'ईडीची चौकशी म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी इव्हेंट..' खासदार सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पवार साहेबांचे बाळ आहे. त्यांनी सगळ्यांना प्रेमाने वाढवलं. त्याच्यातून देश देशाला आणि राज्याला चांगलं नेतृत्व मिळालं, चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचा पाप एका अदृश्य शक्तीने केला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

मंगेश कचरे

Supriya Sule News:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या आज त्यांच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्यासाठी हळदी कुंकाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरील ईडी कारवाईवरुन सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई केली जाते. विरोधी बोलला की त्याच्यावर कारवाई केली जाते. ही नवीन पद्धत गेल्या आठ वर्षात सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच रोहितला नोटीस आली असावी अशी चर्चा आहे," अशी टीका त्यांनी केली.

"सत्ताधाऱ्यांना ईडीची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल. भाजपने (BJP) ज्यांच्यावर आरोप झाले, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले मग त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे काय ? आणि भाजपमध्ये गेल्यावर भाजप त्याला वाशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ करते. देशात सुरू असलेली दडपशाही आम्ही सहन करणार नाही.." असा इशाराही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादी सुनावणीवरुन टीकास्त्र...

"न्यायालयात केस सुरू आहे. पवार साहेब हे 28 वर्षातून या असेंबलीत आले. प्रत्येक सुनावणीला पवार साहेब हजर राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पवार साहेबांचे बाळ आहे. त्यांनी सगळ्यांना प्रेमाने वाढवलं. त्याच्यातून देश देशाला आणि राज्याला चांगलं नेतृत्व मिळालं, चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचा पाप एका अदृश्य शक्तीने केला आहे," अशी टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. (latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT