Rohit Pawar News : रोहित पवार यांची आज ईडी चौकशी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

Rohit Pawar ED Inquery News : खासदार सुप्रिया सुळे स्वत: रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. रोहित पवार यांनीदेखील ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.
Rohit Pawar ED Inquery News
Rohit Pawar ED Inquery NewsSaam Tv
Published On

Mumbai News :

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे.

शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमले आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar ED Inquery News
Maratha Reservation: मनोज जरांगेंचं मुंबईतील मराठा आंदोलन फसणार? सदावर्तेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

रोहित पवार सकाळी ११ वाजेपर्यंत ईडी कार्यालयात पोहोचणार आहे. रोहित पवार यांची ईडी चौकशी संपेपर्यंत शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे स्वत: रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. रोहित पवार यांनीदेखील ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. (latest political news)

Rohit Pawar ED Inquery News
Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांवरुन रस्सीखेच, काँग्रेसचा दावा असलेल्या जागेवर ठाकरे गटाची नजर

रोहित पवार हॅाटेल ट्रायडंट येथून सकाळी १०.३० वाजता ईडी कार्यालयासाठी निघणार आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देखील रोहित पवार भेट घेणार आहेत.

विधानभवनात महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रोहित पवार पुढे जाणार आहेत. बारामती ॲग्रोप्रकरणात आमदार रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर आज ते ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com