बीड : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. (Beed) बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या निपाणी टाकळी गावात विद्युत वाहक तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा (Farmer) होरपळून मृत्यू झाला. बालासाहेब वैजनाथ पांडे असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)
बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तार निपाणी टाकळी येथून गेली आहे. धोकेदायक असलेल्या या तारेबाबत गावकऱ्यांनी महावितरणकडे (Mahavitaran) तक्रार केली होती. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्याला नाहक जीव गमवावा लागला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतातून परतताना घडली घटना
गावातील रहिवाशी मयत बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ५५) हे त्यांच्या शेतातून काम आटोपून घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमीजवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तार अंगावर पडली. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.