Dhule News : कापूस मोजताना मापात पाप; व्यापाऱ्यास चोप देत शेतकऱ्यांनी घेतली भरपाई

Dhule News : व्यापारी गावात येऊन शेतकऱ्याचा कापूस मोजून नेत असतात. अशाच प्रकारे शिंदखेडा तालुक्यातील सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होताशेतकऱ्यांनी घेतली भरपाई
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : कापसाला अगोदरच भाव नाही. यात काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात (Dhule) असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे शेतकऱ्याकडून कापूस (Cotton) घेत असलेल्या व्यापाऱ्याने कापसाच्या वजनामध्ये हेराफेरी करणं चांगलच महागात पडल आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
Cold Wave : शेकोटी करून द्राक्षबाग वाचवण्याचा प्रयत्न; वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

व्यापारी गावात येऊन (Farmer) शेतकऱ्याचा कापूस मोजून नेत असतात. अशाच प्रकारे शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होता. परंतु सदर व्यापारी हा मापात पाप करत असल्याचा प्रकार आज शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या नंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत या व्यापाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच चोप दिला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Dhule Crime : व्यापाऱ्याला लुटणारे दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात; मुद्देमाल केला हस्तगत

५ लाखाची घेतली भरपाई 

सदर व्यापारी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यास चांगलाच चोप दिला आहे, या व्यापाऱ्याने महिनाभरात गावातून घेतलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई पोटी ५ लाख १० हजार रुपये परत केल्यानंतर या व्यापाऱ्याची सुटका गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर गावात या व्यापाऱ्यास कायमस्वरूपीची बंदी करण्यात आली आहे. यामुळे या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणं चांगलंच महागात पडल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com