(लक्ष्मण साळुंखे)
मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे वळवलाय. आज जरांगे पाटील या मोर्चा पुण्यात पोहचलाय. मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन होणार असल्यानं सरकारची डोकेदुखी वाढू लागलीय. मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत मोठा जनसमुदाय जमला असून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहेत. मिळेल त्या वाहनाने मराठा आंदोलक आरक्षण घेण्यासाठी मुंबईकडे येत आहेत.(Latest News)
प्रत्येक गावा-गावातून मराठा आंदोलक जरांगे-पाटीलच्या पाठिंबा देत त्यांच्यासोबत मुंबईकडे जात आहेत. बीड जिल्ह्यातील काका पुतण्या आणि मुलांनी चक्क आरक्षणाच्या मागणीसाठी बैलगाडीतून मुबंईची वाट धरलीय. जिल्ह्यातील सालेलावाडी गावातील काका पुतण्या आणि मुलांनी चक्क आरक्षणाच्या मागणीसाठी बैलगाडीतून मुबंईची वाट धरलीय. सालेलावाडी गावातील या कुटुंबानी दिन दिवसात चक्क १५० किलोमीटर प्रवास करत भीमा कोरेगावपर्यंतचा टप्पा ही पार पार केलाय. त्यांनीसोबत एक छोट चार चाकी वाहन ही सोबत घेतलं असून त्यात त्यांनी बैलासाठी चारा आणि ढेप ही घेतलीय. त्याचबरोबर स्वतःला खाण्यासाठी साहित्य ही घेतलंय.
सरकारला मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकरी मराठा हा कुणबी आहे यांची जाण व्हावी म्हणून मुबंईपर्यंत बैलगाडी घेऊन प्रवास करत असल्याच ही या कुटूंबातील सदस्यांचं म्हंटल आहे.या वेळी बोलताना त्यांनी सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी सुद्धा या कुटुंबानी केलीय.
दरम्यान ही बैलगाडी भीमा कोरेगाव मधून जात असताना आठ वर्षाच्या मुलांनी बैलागडीत बसण्याचा हट्ट धरलं त्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी या सालेवाडीच्या तरुणांनी त्याचा हट्ट पूर्वत त्याला दीड किलोमीटर पर्यंत बैलगाडीत बसून फिरवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.