Sunetra Pawar Calls Urgent Ncp Mlas Meeting After Amit Shah Meet saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? सुनेत्रा पवारांनी अचानक बोलावली आमदारांची बैठक

Sunetra Pawar Calls Urgent NCP MLAs Meeting : अमित शाह यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Bharat Jadhav

  • अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला

  • अमित शाह यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक

  • सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये आज सकाळपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. सकाळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आमदारांची तातडची बैठक बोलवलीय. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय.

सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर या नेत्यांची भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. दरम्यान शाहांच्या भेटीसाठी आणि बैठकीसाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलंय.

राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. शाहांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटात फूट पडणार का असा सवाल राजकीय वर्तुळातील नेत्यांमध्ये उपस्थित होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या भेटीचं कारण सांगण्यात आलंय. अमित शाहांच्या भेटीची वेळ खुद्द सुनेत्रा पवार यांनी घेतली होती. त्यांच्या वतीने राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भेटीला गेलं होतं असं सांगितलं जातंय.

दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देण्यात आला. पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. याआधी सुनेत्रा पवार यांनीच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना अमित शाह यांना दिली होती. त्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती, असे म्हणत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट सुनेत्रा पवारांच्या आदेशानेच झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पवार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाल्याच्या चर्चांना

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळी पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित नव्हते, त्यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना या चर्चांना खोट्या असल्याच म्हटलं. आमचे काही हितचिंतक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनाप्रमाणे बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या भेटीला गेले असतील तर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या सोबत चर्चा केली असेल, असेही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट का घेतली?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नयेत आणि अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात यावे, या दोन प्रमुख मागण्यांवर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या भेटीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अर्थखात्याबाबत भाजपने दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही. कदाचित याच मुद्द्याची जाणीव करून देण्यासाठी ही भेट झाली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवलाय.

सुनेत्रा पवारांनी बोलावली आमदारांची तातडीची बैठक

सकाळपासून राष्ट्रवादीमध्ये घडामोड सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावलीय. आज राष्ट्रादीच्या कोअर कमिटीची बैठक सुरू असतानाच उद्या आमदारांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल चार महिन्यांनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीला महत्त्व आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

78 वर्षांची प्रतीक्षा संपली! पहिल्यांदा ST पाहणारं गाव, ग्रामस्थांचा जल्लोष

Maharashtra News Live Update: लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ रहिवाशांना ६ नोव्हेंबरला हक्काच्या घरांच्या चाव्या!

भारतासह ५६ देशांची माफी मागणार ब्रिटन; पण नुकसानभरपाई देणार नाही, नेमकं कारण काय?

एकाचवेळी 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस प्रशासनात खळबळ, दोन जिल्ह्यांना नवे SP, कोणाची कुठे नियुक्ती?

'राहुल गांधी खऱ्या संसदेत पंतप्रधान होऊ शकत नाहीत'; अमित शाहांनी काँग्रेसला डिवचलं

SCROLL FOR NEXT