

अजित पवार गटात माजी मंत्री अनिल पाटील यांच्या कमबॅकची चर्चा
अमित शाह यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
अजित पवार गटाच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू
अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या कोअर कमेटीची बैठक होणार आहे, त्याआधी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्याची बैठक होत आहे. छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ बैठकीला उपस्थित आहेत.
दुसरीकडे माजी मंत्री अनिल पाटील तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून निरोप मिळताच मुंबईकडे रवाना झालेत. अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार असल्याची चर्चा रंगलीय.
दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अनिल पाटील यांनी थेट भाष्य करणं टाळलंय. जिल्हा बँकेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती त्यांनी दिलीय. जिल्हा बँक निवडणूक लग्न संदर्भात महायुती म्हणून आमची चर्चा झालेली आहे. जिल्हा बँक निवडणूक लग्न संदर्भात महायुती म्हणून आमची चर्चा झालेली आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या तर आम्ही महायुतीसोबत निवडणूक लढू नाहीतर आम्ही आमचा आमचा निर्णय घेऊ, असं अनिल पाटील यांनी म्हटलंय.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला जो सन्मान जनक जागा देईल त्या पक्षासोबत लढणार. भाजपने आणि शिवसेनेने शब्द दिलाय,त्यामुळे पुढच्या काळामध्ये महायुती म्हणूनच निवडणुका होतील, अशी शक्यता अनिल पाटील यांनी वर्तवलीय. सात जागांची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी आहे. आज अर्जाच्या छाननी नंतर त्यावर पुन्हा शेवटची चर्चा होईल, असं पाटील म्हणालेत.
सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळी पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित नव्हते, त्यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमचे काही हितचिंतक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनाप्रमाणे बातम्या पेरल्या जात आहेत.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटीला गेले असतील तर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या सोबत चर्चा केली असेल. भेट घेतली म्हणून मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठीच्या चर्चा असतात असे नाही. अनेक चर्चा करायचे असतात मात्र राष्ट्रवादी पक्षामध्ये केवळ दुफळी आहे, मते मतांतरे आहे असा केवल बागल बुवा करण्याचा प्रयत्न आहे
अमित शहा यांच्याकडे कुठल्याही मंत्र्याच्या कमबॅक होण्यासंदर्भात चर्चा होत नसते. मंत्रिमंडळात विस्तार होत असेल तर त्या त्या पक्षांच्या श्रेष्ठींकडून त्यांची नावे जात असतात. मंत्रिमंडळात कमबॅक संदर्भात जर बोललं तर अजितदादांनी शब्द दिला होता की अडीच वर्षानंतर फेरबदल करू. फेरबदल करून मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करू असा शब्द अजितदादांनी दिला होता.
अजितदादांचा हा शब्द पूर्ण करायचा असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वात होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा अमित शहा यांच्याकडे असेल असं मला काही वाटत नाही, असं अनिल पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.