Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार? अजित पवार गटाच्या या आमदारांना मिळू शकते संधी?

Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्यार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केलं असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

Sandeep Gawade

सुशिल थोरात

Maharashtra Politics

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्यार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केलं असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. तर नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी मिळेल असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. तसंच राज्यात लोकसभा निवडणुकीत 45 प्लसचं लक्ष्य ठेवून २०२४ ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी महायुती काम करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मार्गात त्यांना ठिकठीकाणी मराठा कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. त्यावर क्रीडामंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युती सरकार सकारात्मक असून इतर कोणत्याही जातीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारचं असल्याचं म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ कोटी नव्या रोजगाराच्या संधी

येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठे बदल करणार आहे. यामुळे २३ कोटी लोकांचा रोजगार जाणार आहेत. त्याचबरोबर २५ कोटी जणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नागपूर येथील आर्थिक साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असलल्याचं सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोलाही मारला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT