Shivsena UBT Protest Against ST Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena UBT Protest : ST भाडेवाढ, अख्ख्या महाराष्ट्रात 'चक्काजाम'; ठाकरे गट आक्रमक, पाहा VIDEO

Shivsena UBT Protest Against ST Price Hike : सरकार एका बाजूला लाडकी बहीण योजनेतंर्गत सामान्यांना पैसे देत आहे आणि दुसऱ्या बाजूला एसटी भाडेवाढ करत सर्वसामान्यांकडून दुपट्टीने पैसे परत मिळवत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे.

Yash Shirke

Shivsena UBT Protest News : महायुती सरकारने एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. आता भाडेवाढ प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात महायुती सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन छेडले आहे. कल्याण पुणे, सोलापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

कल्याणजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एसटीच्या गाड्या आडवून निषेध नोंदवला. भाडेवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांकडून भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी होत आहे.

नवी मुंबईच्या पनवेल एसटी डेपोमध्येही ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाड्यामध्ये १५ टक्क्यांनी वाढ केल्याने चक्काजाम आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चक्का जाम केल्याने पनवेल डेपो परिसरात वाहतूक कोंडी झाली. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना डेपोतून हटवले.

पुण्यातही शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोन सुरु आहे. एसटी भाडेवाढ केल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्काजाम करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी गाड्या अडवल्या आहेत. पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही आंदोलन सुरु आहे. नाशिकच्या मनमाड एसटी डेपोमध्ये आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेथे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

उपराजधानी नागपूरमधूनही एसटी बस भाडेवाढ विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नागपूरच्या सावनेर येथे ठाकरे गटाकडून आंदोलन सुरु आहे. नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. सावनेर येथील बसेस काही काळासाठी थांबवण्यात आल्या होत्या.

राज्यात महायुती सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना राबवून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत आहे. तर दुसरीकडे एसटी भाडेवाढ करत सर्वसामान्यांकडून दाम दुपटीने पैसे वसूल करत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे. सरकारने भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT