Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'एकत्र आले तर आनंद; एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन टाकू', CM शिंदेंच्या नेत्याची ठाकरेंना साद!

Maharashtra Politics News: लोकसभा निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचे ४० आमदार परत येतील, असा मोठा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. अशातच संजय शिरसाट यांनी ठाकरेंसोबत परत येण्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १० जून २०२४

'शिवसैनिकांनो, वाघांनो, संघठित व्हा, महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा' अशा आशयाचे बॅनर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदना बाहेर लावण्यात आले असून दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याचं आव्हान करण्यात आले आहे. या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुनच बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

"आजही आम्हाला वाटतं की कोणीतरी पुढाकार घ्या. म्हणा एकदा आपण शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेत जाऊ त्यांची भूमिका घेऊन पुढे जाऊ, आम्हाला आनंद होईल. राजकीय स्वार्थासाठी आम्ही बाहेर गेलो नाही. आमच्या राजकीय भवितव्यासाठी हा उठाव केलेला नाही. एका विचाराने एकत्र येणार असाल. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आम्ही दोन पाऊल पुढे टाकू, पण ते टाकणार नाहीत. ते करंटे लोकांच्या आहारी गेले आहेत," असे संजय शिरसाट म्हणालेत.

तसेच "आम्ही स्वाभिमानाने सांगतो की आम्ही कोणतेही डिमांड करत नाही. तुम्ही अडचणीत आहात, त्यावेळेस तुम्हाला पाठिंबा द्यायचे काम शिंदे साहेबांनी केले आहे. आम्हाला ब्लॅकमेल करायचं असतं तर आम्ही कोणतीही खाती मागितली असतीय पण ती निती आमची नाही," असे म्हणत केंद्रातील खाते वाटपावरुनही संजय शिरसाट यांनी महत्वाचे विधान केले.

"कमी आमदार मोठी सत्ता ही एकनाथ शिंदे यांची शिकवण आहे. आम्हाला दुसरे खातं मिळेल अशी माहिती आहे. ही पहिल्या स्टेजला केलेली ऍडजेस्टमेंट आहे. सरकार स्थिरपणे व्हावे आणि शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण व्हावा, जेव्हा पूर्णविस्तार होईल त्यावेळेस अनेक चेहरे त्या मंत्रिमंडळात दिसतील," असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

SCROLL FOR NEXT