Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर! दोन जिल्हाप्रमुख भिडले, श्रेयवादावरुन हाणामारी अन् मोठा राडा

Maharashtra Political News : दादा भुसे गडचिरोली दौऱ्यावर गेले असताना शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. श्रेयवादावरुन सुरु झालेल्या भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले.

Yash Shirke

  • शिक्षणमंत्री गडचिरोली दौऱ्यावर असताना राडा

  • बैठकीनंतर दोन जिल्हाप्रमुख एकमेकांना भिडले

  • श्रेयवादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

  • शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गटबाजी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षामधील गटबाजीमुळे नेते, पदाधिकारी पक्षांतर करत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी मोर्चेबांधणीला लागले आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे हे बैठकीच्या निमित्ताने गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते. पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले. त्यानंतर शिंदेसेनेतील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये तुफान राडा झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीमध्ये झाले.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षांतर्गत गटबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळाले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची गडचिरोलीमधील सर्किट हाऊसमध्ये शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांसह बैठक होती. या बैठकीसाठी अनेक शिवसेना पदाधिकारी आले होते. ही महत्त्वाची बैठक संपल्यानंतर श्रेयवादावरुन दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद झाला.

सर्किट हाऊसमधील बैठक संपल्यानंतर दादा भुसे चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटातील गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये श्रेयवादावरुन शाब्दिक वाद झाला. ते दोघे एकमेकांना भिडले. वाद इतका वाढला, की दोघे मारहाणीपर्यंत पोहोचले. उपस्थितांनी मध्यस्थी करत दोघांना सोडवले. हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसाठी मोठा धक्का ठरु शकतो असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

SCROLL FOR NEXT