Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shiv Sena News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? आता लवकरच होणार फैसला; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख ठरली!

Shiv Sena Supreme Court Hearing News : शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधातही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार, याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते. अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे.

येत्या १५ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

या याचिकेवरील सुनावणी देखील १९ जुलैला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच (Vidhan Sabha Election 2024) खरी शिवसेना नेमकी कुणाची? याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं नेमकं कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आमदार अपात्रतेचा निर्णय एकतर्फी दिल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. नार्वेकर यांनी जाणून बुजून एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या ३९ आमदारांना अपात्र केलं नाही, असा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालावरून कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ आमदार अपात्र होते. ते करण्यात आलेले नाही, असं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरही १९ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही होणार सुनावणी

निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार यांनी देखील सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर देखील १६ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या वतीने मागच्या सुनावणीवेळी अजित पवार हे प्रचारात शरद पवार (NCP Sharad Pawar) यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता

त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार (NCP Ajit Pawar) यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांबाबत महत्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात पार पडणार असल्याने सर्वांचं याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :फक्त लीड मोजा, महायुती १६० जागांवर येईल - चंद्रकांत पाटील

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT