Maharashtra Political News: आगामी लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे सी व्होटरने सर्व्हे जारी केला आहे. या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पुन्हा एकदा एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण विरोधकांच्या इंडिया आघाडीला सुद्धा मोठं यश मिळणार असल्याचं समोर आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, पक्षात बंडखोरी करून भाजपसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार असल्याचं सर्व्हेत दिसतंय. शिंदे गट आणि अजित पवार गटाला महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त 5 जागा मिळणार, असं सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
केंद्रातील मोदी सरकारने इंडिया आघाडीचा धसका घेतला असून अनेक ठिकाणी भाजप नामोहरम झाली आहे, असा टोला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लगावला आहे. त्याचबरोबर भाजप सोबत जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे बघा, हेच हाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे होतील, असं भाकित सुद्धा अंबादास दानवे यांनी केलं आहे.
अंबादास दानवे यांनी शिंदे गट (Eknath Shinde) आणि अजित पवार गटावर चांगलंच तोंडसुख घेतलं. आमचे गद्दार (शिवसेनेतील फुटीर गट) आणि राष्ट्रवादीचे फक्त 2 ते 4 खासदार निवडून येतील, ठाकरे गटाची ताकद खूप मोठी आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी दोन्ही गटावर केला आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विधानावर देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांच्या विधानाचे परिणाम होत आहेत, असं सांगतानाच, कुणी सोबत आलं तर ठीक नाहीतर स्वबळावर सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी असे वक्तव्य केले असावे. मात्र यातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय हे सत्य आहे. संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सातत्याने केले जात आहे. मात्र महाविकास आघाडीवर याचा काहीही फरक पडणार नाही. भाजपसोबत सत्तेत गेलेले त्यांचे नेते असतील, तर संभ्रम आहेच हे स्पष्ट आहे, असे दानवे म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.