Rohit Pawar slams Ajit Pawar Group  Saamtv
महाराष्ट्र

Rohit Pawar: अजितदादांचा मंत्र्यांवर कंट्रोल नाही का? रोहित पवारांचा संतप्त सवाल

Rohit Pawar slams Ajit Pawar Group : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना सवाल केलाय. अजित पवार यांचे त्यांच्या मंत्र्यावर कंट्रोल नसल्याचं रोहित पवार म्हणालेत.

Bharat Jadhav

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे, या विधानावर आमदार रोहित पवार यांनी अजितदादांना संतप्त सवाल केलाय. दादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण त्यांच्या मंत्र्यांवर कंट्रोल नाही असं म्हणायचं का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

कृषी मंत्री सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहेत. प्रत्येक खेळ कुठेही खेळा आम्हाला काही घेणे नाही. कृषिमंत्री आहात तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा त्यांचे प्रश्न सोडवा, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अहंकाराने बोलत आहात. अहंकार बाजूला ठेवून बोला. सरकारला आणि शेतकऱ्यांना भिकारी म्हटलंय. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी परत एकदा केली.

त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांना संतप्त सवाल केला. अजित पवार यांना त्यांचे नेते काय करतात ते पाहावे लागेल. अजित पवार यांना सांगणं आहे की, त्यांनी कृषिमंत्री बदलावे, एकवेळ त्यांनी स्वत: कृषी मंत्रिपद घ्यावं. पण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा.

दादांचे स्वतःवर कंट्रोल पण त्यांच्या मंत्र्यांवर नाही - रोहित पवार

अजित पवार यांच्यावर आरोप केले होते, त्यावेळेस ते खोटे आरोप होते. पण त्यावेळेस अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. प्रायश्चित्त म्हणून अजित पवार आणि इतर मंत्री कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांचे समाधी जवळ बसले होते. अजित दादांनी राजीनामा दिला त्यावेळेस पवारसाहेब अध्यक्ष होते.

आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काहीही समजतात. दादा आता तसं तर एका पक्षाचे प्रमुख झालेत. तेव्हा पूर्वी तुम्ही आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता. आता अध्यक्ष आहात तुम्ही प्रमुख आहात, आता तुमचे मंत्री अशा पद्धतीने वागत आहेत. मग दादांचे स्वतःवर कंट्रोल आहे, पण त्यांचे त्यांच्या मंत्र्यांवर कंट्रोल नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय.

नको त्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस सुनिल तटकरे साहेब बोलून जातात, आता प्रदेशाध्यक्ष आहात तर तटकरे पळून जात आहेत. पण मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांनी कोणीही निर्णय घ्यावा आणि कृषिमंत्र्यांचा राजीनामा द्यायला लावावा असं रोहित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palasdari Tourism : पावसात खुलणारा पळसदरीचा स्वर्ग; हे Top 7 धबधबे नक्की पहा

Pranjal Khewalkar : महिलेशी संबंध ठेवले, चोरून व्हिडिओही काढला अन्...; प्रांजल खेवलकरांचा पाय अजून खोलात|VIDEO

Maharashtra Live Update: बुलढाण्यातील जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलक वाहून गेले

Krishna Janmashtami 2025: श्रीकृष्णाला बासरी का प्रिय आहे? जाणून घ्या महत्वाची गोष्ट

Janmashtami Special : या जन्माष्टमीला कसा बनवाल सुंठवड्याच्या लाडूचा प्रसाद?

SCROLL FOR NEXT