Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार गटाला धक्का! बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

Maharashtra Political News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा उद्या काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे परभणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे.

Yash Shirke

  • शरद पवार गटातील नेता काँग्रेसमध्ये जाणार

  • उद्या (७ जुलै) होणार जाहीर पक्षप्रवेश

  • यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार

Maharashtra : राष्ट्रवादी शरद पवार गटाला धाराशिव जिल्ह्यात धक्का बसला आहे. भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे. धाराशिवनंतर परभणीमध्ये पक्षाला मोठा हादरा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा उद्या काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. उद्या (७ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल अशी माहिती समोर आली आहे. बाबाजानी दुर्रानी आणि काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.

परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुरेश वरपूडकर यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. सुरेश वरपूडकर यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला परभणीमध्ये धक्का बसला होता. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

२००४ मध्ये बाबाजानी दुर्राणी हे पहिल्यांदा निवडून विधानसभेत आमदार बनले होते. त्यांना २०१२ आणि २०१८ मध्ये विधान परिषदेवर शरद पवार यांनी आमदार केले होते. राष्ट्रवादी पक्षात फुट झाल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण थोड्याच कालावधीत ते शरद पवारांच्या गटात परतले. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

Monsoon 2025 : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय, ३ दिवसात राज्यातून गायब होणार, आज कुठे कुठे कोसळधारा?

धक्कादायक! वॉचमनचं लिफ्टमध्ये काळं कांड; ११ वर्षाच्या मुलीवर विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

Zodiac signs: चतुर्थीच्या योगात आज चार राशींच्या नशिबाचा तारा चमकणार! पाहा तुमची रास आहे का?

SCROLL FOR NEXT